Posted on

लेखणी सरेंडर होतेय…. एका स्त्री संकल्पनेतून ती पुन्हा जन्म घेतेय….

0

शनिवार दि. २५ मे २०१९ रोजी प्रबोधनकार ठाकरे लघु नाट्यगृह, बोरीवली(प) येथे ‘संवेदना प्रकाशन, पुणे’ यांच्यातर्फे कवयित्री कीर्ती पाटसकर यांच्या “लेखणी सरेंडर होतेय…” या प्रथम काव्यसंग्रहाचे मोठ्या दिमाखात प्रकाशन करण्यात आले.

एकंदर खेळीमेळीच्या आणि उत्साहपूर्वक वातावरणात हा प्रकाशन सोहळा पार पाडण्यात आला. विशेष बाब म्हणजे सन्माननीय अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांनी कवयित्री कीर्ती पाटसकर यांच्या कवितांचे विविध पैलू उलगडून उपस्थित रसिक प्रेक्षकांना मार्गदर्शन केले. कलर्स मराठी वाहिनीचे प्रोग्रामिंग आणि बिझनेस हेड माननीय दीपक राज्याध्यक्ष यांनी त्यांच्या मनोगत मांडताना “लेखणी सरेंडर होतेय…” या काव्यसंग्रहाला शुभेच्छा दिल्या. प्रसिद्ध कवी गीतकार समीर सामंत यांनी लेखणी ही वज्रासम धारदार आहे आणि तिला संवेदनेची एक विशिष्ट चमक चढते असे सहोदरण स्पष्ट करुन कीर्ती ताईंच्या कवितांना प्रोत्साहन दिले. काव्यसंग्रहाचे प्रकाशक नितिन हिरवे यांनी किर्ती ताईंच्या कवीमनाशी थेट सुसंवाद साधत अत्यंत प्रबोधकपणे त्यांना पुढील सर्व आवृत्यांसाठी आणि प्रकाशनासाठी संवेदनशील शुभेच्छा देऊन वातावरणात हिरवळ आणली.
सोहळ्यातील उपस्थित प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांनी कीर्तीताईंचे तोंड भरुन कौतुक केले. त्यांना शुभाशिर्वाद देण्यासाठी त्यांच्या शाळेतील शिक्षक मंडळी, वर्गमैत्रिणी आणि विशेष म्हणजे त्यांच्या घरातल्या सार्‍या वरिष्ठ मंडळींनी हजेरी लावली होती. त्यामध्ये त्यांचे पती विवेक पाटसकर खंबीर नेतृत्व करत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते. आई-बाबा, काका-काकू, सासू-सासरे, दिर-नणंद, दोन्ही मुलं श्लोक-समर, मित्र मैत्रिणी आणि शुभेच्छुक मंडळींनी तिच्या पहिल्या काव्यपुष्पाला भरभरुन शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते तुळशीचे रोप, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन प्रमुख पाहुण्यांना सन्मानित करण्यात आले. अशा प्रकारे झाडे लावा झाडे जगवा या सुविचाराने प्रेरित प्रकाशन सोहळा पार पाडण्यात आला.

या कार्यक्रमाला दिग्गज कलाकार मंडळींची उपस्थिती लाभली. मंदार चोळकर, आनंद पेंढारकर, स्वरुपा सामंत, अनुराधा म्हापणकर यांच्या सोबतच कवितांगण परिवाराचे प्रकाश खरात, पंकज दळवी, संदीप बाक्रे, नितीन शिंदे, गुरुदत्त वाकदेकर, ज्योति कपिले, कल्पना म्हापूसकर, अशोक कुलकर्णी, अरविंद देशपांडे, प्रियदर्शनी नाबर, प्रदीप बडदे, स्वाती शृंगारपुरे, नैनेश तांबे, किशोरी पाटील, अस्मिता बोरकर, डॉ. सुनिता कांगणे, चंदन पेठकर, गणपत चव्हाण, ईशान संगमनेरकर, गौरी गाडेकर, चंदन तहसीलदार, मनोज धुरी, श्वेता ठाकूर अशा कवी आणि कवयित्रींची आनंददायी उपस्थिती लाभली होती. तन्वी म्हापणकर, ऋजवी देसाई या दोघींनीही आपला खारीचा वाटा उचलून कार्यक्रम यशस्वीपणे साकारण्यास मदत केली.

सुत्रसंचालक गितेश शिंदे यांच्या मनमोहक आणि दिलखेचक सुसंवादाने हृदयस्पर्शी अशा ह्या सोहळ्याची सांगता झाली होती. प्रेक्षकांच्या शुभेच्छांना, सहकार्याला त्यांनी आजवर कवितेवर केलेल्या प्रेमाला ही लेखणी सरेंडर होतेय अशी निर्मळ भावना शेवटी कीर्ती पाटसकर यांनी मनोगत व्यक्त करताना स्पष्टपणे मांडली.

0
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *