Posted on

समर्पण- सांची कांबळे

170+

हा पाऊस रुजलाय माझ्यात
खोलवर…
अंगावर सरसरून येणाऱ्या शहा-यांत
तोच फुलत असतो…

आभाळभर पसरणा-या
धावत्या सरी-
जशा तानपु-याच्या
झंकारणा-या तारा…
नि त्यावर फिरणारी-
ती थरथरती बोटं…

या भरल्या आभाळाशीच
जोडलं जातं
माझं अवघं विश्व-
काही कळायच्या आतच…

हरवून जाते मी-
पानापानांतून ओथंबणा-या पागोळ्यांत,
तरारून येणा-या उभ्या रानात,
अर्धवट भिजल्या भुरभुरणा-या केसांत,
अन् धडधडत्या काळजाची लय सावरणा-या –
या पावसाच्या आदिम स्वरांत…

नको नको म्हणता
भिजवतोच हा पाऊस…
भिजवतो कसला-
विरघळवतो ;
कणाकणानं !….

हट्ट सोडते मग मी,
अन् झेलून घेते,
माझ्या दिशेनं धावत येणा-या
सरींचा आवेग…

मोकळ्या मनानं
कुरवाळून घेते,
हा काळजात घुसणारा वारा…

…अन् भिजून जाते चिंब…
वाहू देते स्वतःला,
या वाहत्या सरींत…

माहितीये मला-
की परतीचा आहे हा पाऊस…
निघून जाईल केव्हातरी-
कायमचाच !…

पण तरीही असा सर्वस्वात
भिनत राहतो तो,
की ढळतात सारे निर्धार….
पुसट होतात रेषा…

जीव ओवाळून टाकते मी आता,
या चार क्षणांवर…
उद्या नसतील
या सरी कदाचित ;
पण म्हणून जगणंच राहून जायला नको !

सांची कांबळे

 

 

170+

48 thoughts on “समर्पण- सांची कांबळे

 1. छान

  1. सांची,खूप छान कविता.

   1. Very nice

   2. प्रबोध चव्हाण यासकडून शूभेच्छा

  2. सांची,
   तूझी वैचारिक प्रगल्भता बघून अवाक झाले. God bles you.

  3. सांची,
   तूझी वैचारिक प्रगल्भता बघून अवाक झाले. God bless you

 2. Chhan Kavita! Aashyghan. Best of luck..& congrats Sanchi.

  1. सुंदर

  2. खूपच छान कविता

 3. Nice

  1. खूपच छान, मनाला भुरळ घालाणारी शब्दरचना

 4. खूपच छान कविता !!

 5. Very nice sanchi baala

  fantastic poem sanchi
  aplya Juwathi Rajapur che naav roshan kar….

  sandeshkamble
  m.no.9765574061

 6. खूप हृदयस्पर्शी कविता सांची. शुभेच्छा

 7. खूपच छान आशयघन कविता!!!

 8. very nice poem!!!

 9. Khupch mast.

 10. Mast. Patawadhan college cha nav kadalas

 11. Very good

 12. Nice

 13. छानच आहे

 14. छान आहे

 15. छानच

 16. छानच खूप
  आवडली

 17. खरंच, स्वतः ला पहात होतो मी तुझ्या कवितेत.
  Khup sundar.

 18. खुपच छान
  आशयघन कवीता
  वाचताना वाटत राहतं
  पाऊस आलाय
  आपणही पावसात भिजून याव

  1. Truly heart rethymic. give your best dear and congratulations you are outstanding

 19. अप्रतिम काव्यरचना..😊

 20. अतिशय सुंदर

 21. सांची कविता वाचून भारावून गेलो.काव्य रचना छान.तुला पुढील वाटचालीसाठी खूपखूप शुभेच्छा!

 22. l like the poem.
  congrest.

 23. छान कविता सांची

  1. छान कविता आहे

 24. सांची तूझी कविता अप्रतिम आहे खुपच छान

 25. Lay Bhqri

 26. Lay Bhari

 27. Excellent poem!

 28. Excellent poem!

 29. खूपच सुंदर

 30. खूप छान कविता

 31. सुंदर काव्यरचना

 32. Chan

 33. सांची खुपच छान कविता अप्रतिम ……..

 34. very nice poem. congratulations Sanchi .

 35. Khupach sundar.best of luck sanchi. Khup mothi ho.

 36. अप्रतिम

 37. कविता खूप सुंदर पण तुझे फोल्लोर्स (comments) पाहून एकदम चकित..👌

 38. खूप मस्त….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *