Posted on

आठवतं- ऋतुजा परदेशी

54+

अजूनही आठवतं
तुझं असणं आठवतं तुझं नसणं आठवतं
अचानक येणं आणि तस्संच जाणं आठवतं
फार फार बोलणं आणि बोलतानाच थांबणं आठवतं
..अजूनही आठवतं.

माझं अबोल अंगण आठवतं
तुझं बोलकं आभाळ आठवतं
माझं शब्द जपत जाणं आणि
तुझं वाहात राहणं आठवतं
अजूनही आठवतं!

संध्याकाळी प्राजक्ताचं ‘केशर’ होणं आठवतं
सुटता सुटता गाठींचंही अडकून राहणं आठवतं
पहाटेचे मोती अलगद निखळून जाणं आणि
तुझ्या डोळ्यांत त्यांचं चमकून जाणं आठवतं
..अजूनही आठवतं!

ऋतुजा परदेशी

 

54+

11 thoughts on “आठवतं- ऋतुजा परदेशी

 1. नेहमीप्रमाणेच अप्रतिम लिहीलस छोटी….अंतिमफेरीसाठी तुला शुभेच्छा अन तुच जिंकणार हा विश्वास ही आहे

 2. अप्रतिम

 3. आठवतं 😍

 4. Chhan

 5. As Usual
  भारी 😍

 6. Sundar!

 7. Superb

 8. Khoop Sundar lihites Rutuja!! I hope you win!!

 9. Khup chan lihilayes rutu… 😇😇 apratim…

 10. एकदम छान .. उत्कृष्ठ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *