Posted on

मायची_हाक ! -सुधीर वि. देशमुख 

18+

बाळ तू मोठा साहेब झालाय
हाफ पॅन्टचा सुटा बूटात आलाय
मोठी गाड़ी मोठा बंगला
कमावतो आहे खुप चांगला

आता सारखा तू कामात असतो
लहान गोष्टी साठी वेळ नसतो
लहान होता तेव्हा बीमार झालता
बा तुया रातभर जागला

गावात नव्हता डॉक्टर वैद्य
पाठीवर घेऊन तुले शहर गाठलं
आता बा जरा थकलाय
पाठीपासून थोडा वाकलाय

काल रात्रि अचानक उठलं
रातभर सारख्ं खोकत बसलं
तालुक्यात तुले शाळेत टाकलं
खुट्यावरच वासरु विकुन टाकलं

पैसा तुया आम्हास नको
गाड़ी बंगला तर अजिबात नको
बा च तेवढं ऐक
गावात येऊन एकदा भेट

तेल संपलेला दिवा तो
परत कधी पेटनार नाही
विझला आता तर
कधी तुला दिसणार नाही

मग कधी तू तेरवि करशील
समाज सर्व जेवू घालशील
सगे सोयरे येतील रे सर्व
पण बा तुया दिसणार नाही.

सुधीर वि. देशमुख 

 

18+

2 thoughts on “मायची_हाक ! -सुधीर वि. देशमुख 

  1. वास्तविकता आहे… डोळे पाणावलेत ..सुधीर पंत मनोवेधक लेखन करता आपण

  2. धन्यवाद भाऊ !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *