Posted on

घन व्याकुळ व्याकुळ होतो- स्वाती गोडबोले 

182+

घन व्याकुळ व्याकुळ होतो
मन गाभूळ गाभूळ होते
विरह …अभंग आळवित जातो
मग देहाचे राऊळ होते

कड़ ओलावते ड़ोळा
की सांज अधिर ही होते
तुझा स्पर्श ओढूनी घेते
मग निश्चल नीर होते

काळजी अनावर होते
हुरहुर उरी उरताना
तू नसतो ना निराळा
तुझ्यात मी मुरताना

देहाचे अंतर मग
काळीज छेदून जाते
स्फुंदन उरते गात्री
किंकाळी भेदून जाते

नांदते इथे व्याकुळता
माहेरवाशीण जैसी
पुन्हा सासरी जाताना
मन गडबड गोंधळ होते

स्वाती गोडबोले 

 

182+

55 thoughts on “घन व्याकुळ व्याकुळ होतो- स्वाती गोडबोले 

 1. Very
  Nice Swati keep it up

  1. Wow swati hats off …. अशीच लिहीत जा

  2. अफलातून
   अप्रतिम

 2. मस्तच, आशय 💐💐

  1. Khup Chan Swati apratim

 3. घन व्याकुळ व्याकुळ होतो
  मन गाभूळ गाभूळ होते
  विरह …अभंग आळवित जातो
  मग देहाचे राऊळ होते

  किती छान आहेत या ओळी . केवढी उंची गाठलीय या वाक्यानं … प्रत्यक्ष विरह अभंग आळवतोय . विरह स्वतःच वेदना सांगू लागलाय. किती व्याकूळता असेल त्या अभंगात …आणि मग या देहाचं मंदिर होतंय. आत विरह व्याकूळ आणि बाहेरही तसंच .बाहेर घन व्याकुळ झालाय विरहानं .. भेटावा तो कृष्णसखा ..पांडुरंग ..ही तर कुण्या संतांचीच रचना वाटतेय .

  कड़ ओलावते ड़ोळा
  की सांज अधिर ही होते
  तुझा स्पर्श ओढूनी घेते
  मग निश्चल नीर होते

  काय बोलावं ? तुझा स्पर्श ओढून घेतल्यावर जी तृप्ती मिळतेय त्यानं सारा सरोवर शांत निश्चल होतो . आधी ओलावलेली कड भरतीचं उधाण आणतेय . डोळे भिजवतेय ..आणि ते वादळ तुझ्या स्पर्शानं थांबतं मग .

  काळजी अनावर होते
  हुरहुर उरी उरताना
  तू नसतो ना निराळा
  तुझ्यात मी मुरताना

  तू कुठं वेगळा आहेस ? पण तरिही काळजी लागते रे तुझी ..मग नाहीच द्वैत उरत .मी एकरुप होउन जाते . पण त्या आधी तुझं दर्शन होईपर्यंत मात्र हुरहूर खूप वाढलेली असते .

  देहाचे अंतर मग
  काळीज छेदून जाते
  स्फुंदन उरते गात्री
  किंकाळी भेदून जाते

  पण एकरुप होउनही तुझे माझे देह दोन कसे ? हे कसलं अद्वैत ? ही जाणीव खूप असह्य आहे की तू आणि मी वेगळे आहोत ..मग अश्रू येतात पण नकळत किंकाळी पण फुटतेच रे ईश्वरा !

  नांदते इथे व्याकुळता
  माहेरवाशीण जैसी
  पुन्हा सासरी जाताना
  मन गडबड गोंधळ होते

  हे मला सगळ्यात आवडलेलं कडवं ..अध्यात्मात तुकोबाराय आपल्याला मी संतांची लेक आहे असं म्हणतात .मी शृंगारलेल्या मांडवखालून निघालेय .मुक्ती ..परमेश्वराचं दर्शन नी भेट याला ते सासर म्हणतात ..ही लेक ईश्वर भेटीसाठी व्याकूळ झालीय .ही संतसंगत सोडून मला या जगताच्या पलिकडं निघून जायचं आहे . तर च मग मला परमेश्वर भेटेल . म्हणून ही माझा गडबड गोंधळ उडालाय .

  स्वातीजी ,
  खूप खूप सुंदर कविता …!
  खूप दिवसांनी एवढी सुंदर रचना अभ्यासता आली ..

  हॅट्स ऑफ .

  -शिरीष

  1. वाह खुप सुंदर प्रतिक्रिया 😊

  2. सुंदर कविता स्वाती

 4. विरह आणि त्यातील आर्तता अगदी अचुक वेध घेतला आहे, केवळ पसंतीस न उतरता काळजात कुठेतरी खोलवर उतरते हे काव्य, प्रतिक्रिया नोंदवणे अपरिहार्य होते….

 5. अर्थगर्भ…

 6. very nice

 7. Khup chhan swati

 8. खूप सुंदर आशयघन कविता

 9. आवडली…… विरहाची व्याकूळता…..

 10. Sunderch

 11. Khup Sunder..Kavita..

 12. Khup chan ahe कविता Swati Tai.. Keep it up..

 13. खूप खूप धन्यवाद
  इतकं छान विश्लेषण केलं आहेत तुम्ही

 14. खूप खूप धन्यवाद
  इतकं छान विश्लेषण केलं आहेत तुम्ही

 15. खुप छान

 16. Khup chhan..

 17. Khoop ch chhan 👌

 18. काय बोलावं ? अप्रतिम … अप्रतिम

 19. अप्रतिम स्वाती 👌👌👌

 20. अप्रतिम

 21. Khup sunder!!!

 22. Khup chhan Swati

 23. Superb Swati

 24. SUNDER rachana

  1. Apratimach 👌👌👌
   Keep it up…all the best.

 25. खूप सुंदर कविता

 26. Apratim

 27. Sunder kavita swati

 28. छान कविता !

 29. अप्रतिम

 30. Khup sunder kavita swati

  1. 1 no

 31. सुंदर!

 32. फारच छान!

 33. खूपच छान भावावस्था वर्णन केलीय. विरहीणीपासून तृप्त प्रेयसीपर्यंतच्या भावनांचे कल्लाेळ मार्मिकपणे, प्रगल्भपणे व्यक्त झाले आहेत..
  -किरण रा तानपाठक

 34. Mast
  Fàaaaar Chan

 35. नांदते इथे व्याकुळता
  माहेरवाशीण जैसी
  पुन्हा सासरी जाताना
  मन गडबड गोंधळ होते

  खूप सहज सुंदर हृदयस्पर्शी शब्द रचना
  खूप खूप आभार…
  अशा अजूनही खूपशा तुझ्या कडून आम्हा वाचकांच्या सतत वाचनात येवोत.. या अपेक्षेसह पुन्श्च खूप खूप अभिनंदन….
  धन्यवाद.

 36. वा अप्रतिम तरल रचना

 37. सुंदर स्वाती जी…!

 38. Nice

 39. खूप छान लिहिलय ! ☺👍

 40. वाह.. अप्रतिम

 41. छान कविता पहिलं आणि शेवटचं कडवं विशेष आवडलं
  लिहीत रहा खूप खूप शुभेच्छा!💐

 42. Awesome Swati keep it up
  ….

 43. सुंदर ग स्वात्या

 44. सुंदर लिहिलंत

 45. फार सुंदर आशयघन कविता

 46. खुप छान छान काव्य आहेत,
  पुढील कार्यास मनापासुन शुभेच्छा 🌺

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *