Posted on

“थिंक टँक राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार” जाहीर

0

 

—————————————————————–

प्रा. श्रीमंत कोकाटे, डॉ. सुनील अवचार, वंदना कुलकर्णी मानकरी
——————————————————————

सोलापूर : प्रतिनिधी
थिंक टँक पब्लिकेशन्स, सोलापूरतर्फे “थिंक टँक राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार” प्रा. श्रीमंत कोकाटे, डॉ. सुनील अवचार, वंदना कुलकर्णी यांच्या ग्रंथांना जाहीर झाल्याची माहिती ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. पुरस्काराचे वितरण शनिवार, 27 जानेवारी 2018 रोजी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.

थिंक टँक पब्लिकेशन्सतर्फे चौथ्या वर्धापनदिनानिमित्त यंदापासून प्रथमच “राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार” देण्यात येत आहेत. या पुरस्कारासाठी राज्यभरातून प्रस्ताव मागविण्यात आले होते. जवळपास 113 ग्रंथांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते.
प्रा. श्रीमंत कोकाटे यांच्या “छत्रपती शिवाजी महाराज (सचित्र चरित्र)” या ग्रंथास दिवंगत पोलिस अधिकारी वसंतराव पगारे यांच्या स्मरणार्थ, डॉ. सुनील अवचार यांच्या “केंद्र हरवत चाललेल्या वर्तुळाचा परिघ (काव्यसंग्रह)” ग्रंथास दिवंगत सुभेदार सोनाप्पा मागाडे यांच्या स्मरणार्थ, तसेच वंदना कुलकर्णी यांच्या “काव्य सरिता सोलापुरी (संपादन)” या ग्रंथास दिवंगत जनार्दन गायकवाड यांच्या स्मरणार्थ हे राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार जाहीर झाले आहेत.


रोख रक्कम, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. शनिवारी ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांच्या हस्ते व ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सहाय्यक पोलिस आयुक्त भरत शेळके, भविष्य निर्वाह निधी विभागाचे क्षेत्रीय आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे, ज्येष्ठ पत्रकार दयानंद माने, डॉ. बाळकृष्ण मागाडे (वाई, जि. सातारा), सामाजिक कार्यकर्ते सुधीर चंदनशिवे, श्रीकांत गायकवाड उपस्थित राहतील.
ग्रंथांची निवड ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली.

कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन थिंक टँक पब्लिकेशन्सच्या प्रकाशिका रसिका भंडारे, संचालक डॉ. बाळासाहेब मागाडे तसेच ऋषीकेश खाकसे, धनंजय पाटील यांनी केले आहे.
📚📚📚📚📚📚📚📚📚

0
Posted on

‘क’ च्या दुसऱ्या प्रयोगात कविवर्य अशोक नायगांवकर

0


मराठी भाषेला समृद्ध करणारे आणि मराठी मनाला विचारांचे नवे वळण देणारे अनेक कवी होऊन गेले. पण कवींच्या कित्येक कविता अजूनही रसिकांपर्यंत पोहोचल्या नाहीत असं दिसून येतं. ह्याच उद्देशाने कोलाज नावाच्या संस्थेने ‘क’ नावाच्या कार्यक्रमाची निर्मिती केली ज्यात एका प्रख्यात कवीच्या आतापर्यंत राहून गेलेल्या किव्हा लोकांपर्यंत न पोचलेल्या कवितांचं वाचन केलं जातं. ह्या कार्यक्रमाची सुरवात कवी श्री अरुण म्हात्रे ह्यांच्या ‘अनरेड’ कवितांपासून सुरु झाली. येत्या २१ जानेवारीला ह्या कार्यक्रमाचा दुसरा प्रयोग ठाण्याच्या सहयोग मंदिरच्या दुसऱ्या मजल्यावर सायंकाळी  ५. ३० वाजल्यापासून पार पडणार आहे.

ह्या कार्यक्रमात कविवर्य अशोक नायगांवकर ह्यांना निमंत्रित कवी म्हणून बोलावण्यात आलं आहे. संकेत म्हात्रे, पंकज दळवी आणि गीतेश शिंदे हे त्यांच्या अप्रकाशित तसंच आतापर्यंत कार्यक्रमातून न वाचलेल्या कवितांचं त्यांच्यासोबत वाचन करतील. तेवढंच नाही तर त्यांना त्यांच्या कवितेसंबंधी, मराठी कवितेविषयी प्रश्नही विचारतील.


“एकीकडे आपण नायगावकरांना हास्य कवी म्हणून बघतो पण ते सामाजिक आणि तितकेच गंभीर कवी आहेत हे लोकांना फारसं माहीत नाही.  त्यांच्या वाटेवरच्या कविता ह्या काव्यसंग्रहातल्या कविता काळापुढच्या आहेत आणि गंमत म्हणजे त्या फारशा त्यांनी कार्यक्रमात वाचल्या नाहीत, म्हणून ह्या कार्यक्रमातून लोकांपर्यंत त्यांच्या ह्या कविता पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील,” असं पंकज दळवी ह्यांनी स्पष्ट केलं.

हा कार्यक्रम २१ जानेवारीला ठाण्याच्या सहयोग मंदिर येथे सायंकाळी ५. ३० वाजल्यापासून पार पडेल.

हा कार्यक्रम विनामूल्य आहे.

0
Posted on

एक रविवार मराठी कवितेचा दर्जा आणि समृद्धी अनुभवण्यासाठी

0

नवे वर्ष… नवे कवी… नवा मुक्काम…

पुन्हा एकदा आपल्या भेटीला !
अष्टगंध प्रस्तुत

कवितेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी…

मु.पो.कविता

रविवार दिनांक २१ जानेवारी २०१८
सायं. ४ वाजता.

रवींद्र लघुनाट्यगृह, प्रभादेवी, दादर.

सत्र-१

अंकुश आरेकर, मकरंद सावंत
अरूण गवळी, अमेय घरत
संदीप पाटील, रत्नमाला शिंदे

सत्र-२

नारायण लाळे, सतीश दराडे
प्राजक्त देशमुख, गोविंद नाईक
ज्योत्स्ना राजपूत, अन्वर मिर्झा

◆ अष्टगंध प्रकाशित कवी अन्वर मिर्झा यांच्या
शेवटी कविताच राहते शिल्लक‘ काव्यसंग्रहाचे प्रकाशन.

निवेदक/सूत्रधार : संजय शिंदे

संपर्क : ९८९२ २७६८३१

देणगी प्रवेशिका : १०० रु.

(प्रयोगाच्या दिवशी सभागृहावर उपलब्ध)

◆ देणगीदार/जाहिरातदार/प्रायोजकांचे स्वागत.

◆ नक्की या… मराठी कवितेचा दर्जा आणि समृद्धी अनुभवण्यासाठी…

0
Posted on

‘ओनामा’ हा नितळ मनाने लिहिलेला काव्यसंग्रह : लक्ष्मीकांत तांबोळी

0

नांदेड : २४ डिसेंबर

भावकवितेतील चिंतनशुद्धता कवी निशांत पवार यांच्याकडे आहे. ओनामा हा नितळ मनाने लिहिलेला पहिलाच कवितासंग्रह होय, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांनी केले.

कवी निशांत यांच्या ‘ओनामा’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ कुसुम सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. भगवंत क्षीरसागर तर भाष्यकार म्हणून प्रा. बी. एन. चौधरी व प्रा. यशपाल भिंगे उपस्थित होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संजीवकुमार राठोड, निर्माता, जय जगदंबा प्रॉडक्शन्स हे उपस्थित होते. प्रारंभी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दीप प्रज्वलनानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इसाप प्रकाशनाचे संचालक दत्ता डांगे यांनी केले. त्यानंतर प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी सरांच्या हस्ते कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कवी निशांत पवार यांनी यावेळी कवितालेखनामागची भूमिका विषद केली.

प्रा. तांबोळी पुढे म्हणाले की कवी हा जन्मावा लागतो. त्याचे आयुष्य Continue reading ‘ओनामा’ हा नितळ मनाने लिहिलेला काव्यसंग्रह : लक्ष्मीकांत तांबोळी

0
Posted on

दैनिक ‘सकाळ’ने दिली ब्रोनॅटो च्या यशोगाथेची नोंद

0

ब्रोनॅटोची बुक राईड १२/१२/२०१७

‘सध्याची पिढी वाचत नाही’ हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. पण थोडं बारीक निरीक्षण केल्यास जाणवेल की, सध्याची पिढी भयंकर वाचन करते आहे. पण ते डिजिटल स्वरूपातील वाचन आहे. या डिजिटल वाचनाची एक बाजारपेठ निर्माण झाली आहे. आणि या बाजारपेठेत सर्वात वेगाने वाढ होते आहे ती म्हणजे ‘ईपुस्तक उद्योगाची’.

२०१४ मध्ये जेव्हा मी ईपुस्तक प्रकाशन व्यवसायात उतरलो तेव्हा असं जाणवलं की या क्षेत्राचा ‘उद्योग’ म्हणून विकास होत नाहीये. आणि मला तर या क्षेत्रातील अमाप संधी खुणावत होत्या. मी ठरवलं की आपण व्यावसायिक दृष्ट्याच व उद्योग म्हणूनच ई पुस्तक निर्मिती करायची आणि ते ही जागतिक मापदंड वापरून. सुरुवातीपासूनच ईपुस्तके अधिक Continue reading दैनिक ‘सकाळ’ने दिली ब्रोनॅटो च्या यशोगाथेची नोंद

0
Posted on

‘अक्षर मानव’कडून इतकी मोठी संधी, तुम्ही ती चुकवूच नये

0

एका चौफेर लेखणीशी मनमोकळा, आनंददायी आणि ज्ञानवर्धक संवाद सहवास.

|| अक्षर मानव संवाद सहवास ४ ||

दर चार महिन्यांनी एका मान्यवर, अभ्यासू व्यक्तीला बोलवावं आणि सलग दोन दिवस त्या व्यक्तीच्या संगतीत राहावं, असा एक अनोखा उपक्रम अक्षर मानवकडून घेतला जातो. पहिला संवाद सहवास झाला, डॉ. आ. ह. साळुंखे यांच्याशी, तर दुसरा संवाद सहवास झाला, डॉ. गणेश देवी यांच्याशी. आता हा तिसरा संवाद सहवास प्रसिद्ध लेखक, समाजकार्यकर्ते, छंदकार डॉ. अनिल अवचट यांच्याशी झाला. आता चौथा संवाद सहवास लोकसंस्कृतीच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांच्याशी होतो आहे.


निवांत, शांत ठिकाणी फक्त पन्नास माणसांनी जमावं आणि दोन दिवस मनमोकळ्या संवादाचा अनौपचारिक आनंद घ्यावा असा हा कार्यक्रम आहे.
यासाठी कसलीही फी, प्रवेशमूल्य नाही. राहण्याजेवणाची सोय मोफत.
ठिकाण : सातारा
दिनांक : १३, १४ जानेवारी २०१८.
नावनोंदणी मात्र आवश्यक. इच्छुकांनी स्वतःच्या माहितीसह मेलवर संपर्क करावा.
aksharmanav@yahoo.com

0
Posted on

लेखनस्पर्धा ‘मराठी भाषा पंधरवडा’च्या निमित्ताने

0
१ जानेवारी ते १५ जानेवारी हा मराठी भाषा पंधरवडा म्हणून शासनाने घोषित केला आहे. गेले ३ वर्षे ज्ञानभाषा मराठी तर्फे हा पंधरवडा नेहमीच्या पठडीतले विषय न घेता इतर वेगवेगळ्या विषयांची निवड करून साजरा केला जात आहे आणि शासनाला अशा नवनवीन उपक्रमांची आम्ही माहिती देत आहोत.
#ज्ञानभाषामराठीपंधरवडा
उपक्रम २ – स्पर्धा
विषय – विज्ञानतंत्रज्ञानपरलेखन
बहुतेकवेळा आपण ललित साहित्याशी संबंधित विषयांवर निबंध स्पर्धा पाहत आलो आहोत. काळ बदलला, लोकांच्या आवडी-निवडी-हौशी-छंद सर्वच काळाप्रमाणे बदलत चालले आहेत. मग त्यानुसार अशा निबंध स्पर्धांचे विषयदेखील बदलायला हवेत आणि म्हणूनच त्यात आजच्या पिढीला रस वाटावा अशा विषयांचा समावेश केला पाहिजे या हेतूने ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानने चाकोरीबाहेर विचार करून विज्ञान-तंत्रज्ञानात मराठी या मूळ उद्देशाला कुठेही फाटा न देता, खुल्या गटाकरता पुढील विषयांवर निबंधलेखनस्पर्धा आयोजित केल्या आहेत.
◾ मला आवडलेले गॅजेट (तांत्रिक मुद्द्यांच्या अनुषंगाने)
◾मला आवडलेली दुचाकी/चारचाकी (तांत्रिक मुद्द्यांच्या अनुषंगाने)
◾सोशल मिडीया आणि मी
◾२१ व्या शतकातील शेती (तांत्रिक, वैज्ञानिक मुद्द्यांच्या अनुषंगाने)
◾ डिजिटल युगातील शिक्षक
शब्दमर्यादा : १२०० शब्द
निबंध पीडीएफ फाईलमध्ये  पुढील इमेलआयडीवर पाठवणे बंधनकारक आहे.
_निबंध पाठवायची शेवटची तारीख :_
_५ जानेवारी-२०१८_
अधिकाधिक मित्र-परिवाराला ज्ञानभाषामराठी च्या whatsapp गटांशी जोडून घ्या….गटात प्रवेशासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा.
सुचिकांत वनारसे-९०५२३४४४७६
अजित तिजोरे-८०९७६१७०२०
मृणाल पाटोळे-७६०६९१९८१६
फेसबुक पान – https://www.facebook.com/sarvatramarathi/
फेसबुक ग्रुप – https://www.facebook.com/groups/379194545862517/
ट्विटर हँडल – @SarvatraMarathi
#मराठीभाषापंधरवडा
#१ते१५जानेवारी२०१८
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठाण
संदेश पुढे पाठवत रहा
0
Posted on

मोडीलिपीचा फाँट तयार करण्याचा माझा प्रवास- नवीनकुमार माळी

1+

मोडीलिपीचा फाँट तयार करण्याचा माझा प्रवास

मोडी ही भारताची वैभवशाली लिपी आहे. ही जवळपास 700-800 वर्षे हस्तलिखित होती. मोडी लिपीचे फाँट एकविसाव्या शतकात उपलब्ध झाले आहेत. पण काही मोडी तज्ञांचे मत होते की, सध्या उपलब्ध असलेल्या फाँटमध्ये काही त्रुटी आहेत, त्यामध्ये मोडीचे खास वैशिष्ट्ये असलेली ’’र’’ च्या करामतीचे अक्षरे खूप कमी आहेत, त्यात अजून वाढ होण्याची गरज आहे. मोडीला नव्या फाँटची गरज आहे असे कळल्यावर मी कामाला लागलो. मॉड्युलर इन्फोटेक प्रा. लि. Continue reading मोडीलिपीचा फाँट तयार करण्याचा माझा प्रवास- नवीनकुमार माळी

1+
Posted on

सातवे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन

0

शिक्षकांच्या साहित्यप्रज्ञेचा शोध घेणारे व शिक्षकांना प्रेरणादायी ठरणारे सातवे शिक्षक साहित्य संमेलन २० जानेवारी, २०१८ रोजी दामोदर हॉल, परळ, मुंबई येथे संपन्न होणार आहे.

या शिक्षक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शिक्षकांसाठी स्वरचित काव्यवाचन स्पर्धा, समूहगीत गायन स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा, पत्रलेखन स्पर्धा, शैक्षणिक साहित्य स्पर्धा आणि सचित्र कविता स्पर्धा अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

यापैकी काव्यवाचन, समूहगीत गायन, एकपात्री अभिनय या स्पर्धा शनिवार दिनांक ३० डिसेंबर, २०१७ रोजी सकाळी ठीक १० वाजता पुढील ठिकाणी होतील-

डी. एस . हायस्कूल, 
गुरुकृपा हॉटेलजवळ,
सायन (प.), मुंबई.

(दादर स्टेशनपासून सेंटर रेल्वेवरील दुसरे स्टेशन)

◆ शैक्षणिक साधन स्पर्धा व सचित्र कविता स्पर्धा संमेलनाच्या दिवशी दामोदर नाट्यगृह येथे सकाळी ९ वाजता घेण्यात येईल.

अधिक माहितीसाठी व नोंदणी करण्यासाठी पुढील शिक्षकांशी संपर्क करा.

काव्यवाचन स्पर्धा :
संजय शिंदे – 98922 76831
अन्वर मिर्झा – 88066 90022

समूहगीत गायन स्पर्धा :
ज्योती खांबे – 98690 55914
कल्पना शेंडे- 95946 52817

पत्रलेखन स्पर्धा : 
संजय गवांदे- 98690 41664
अमोल पाटील-81493 41071

सचित्र कविता स्पर्धा :
राम अहिवले – 98673 63659

एकपात्री अभिनय स्पर्धा :
अशोक सुंबे – 87791 75136

शैक्षणिक साहित्य स्पर्धा :
अशोक हिरे – 92212 88136

सर्व शिक्षकांना आग्रहाचे निमंत्रण 

0
Posted on

ब्लॉग लेखनसंबंधीत कार्यशाळा

0

महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्य सेतू आयोजित कार्यशाळा

रविवार १७ डिसेंबर २०१७ सकाळी १० ते संध्या. ६

कार्यशाळा क्र. ५

◆ *ब्लॉगलेखन कसे करावे?*◆

ब्लॉगलेखन ही आधुनिक काळातील एक अद्भुत आणि विलक्षण लेखनकला आहे. लेखनाच्या विविध टप्यांवर माणसाने सुरवातीला भुर्जपत्रांवर लेखन सुरू केले. बोरू, शाई आणि कापडावरील लेखनापासून कागद आणि छ्पाई तंत्रातील विविध बदलांना सामोरे जाताना आता तो पेपरलेस लेखन करू लागला आहे. आणि नुसते लेखन नव्हे तर त्यातून तो चांगली कमाई देखिल करू लागला आहे. ब्लॉग लेखन ही एक कला आहे, एक शास्त्र आहे आणि एक कौशल्य आहे.

ब्लॉग लेखन अजिबात अवघड नाही. गरज आहे ती त्याचे तंत्र समजून घेण्याची आणि ते चिकाटीने आत्मसात करण्याची. ब्लॉगर म्हणून उत्तम करिअर संधी आहे. आपण लेखक, कवी, कथाकार, कादंबरीकार, गझलकार, पत्रकार, समिक्षक, ललित लेखक, सदर लेखक, अनुवादक, प्रकाशक  कोणीही असा… ब्लॉग लेखनाचे कौशल्य तुम्हाला एका वेगळ्या उंचीवर नेईल आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये चार चॉंद लागतील. ब्लॉग तुम्हाला देशात, विदेशात करोडो लोकांपर्यंत घेवून जाईल आणि तुमचा एक विशेष चाहता वर्ग तयार होईल.

*आपले लेखन ‘साहित्य सेतू’च्या ब्लॉगवर प्रसिद्ध केले जाईल.*

■ *प्रमुख मार्गदर्शक* ■

१) भाऊ तोरसेकर
२) मुकुंद नाडगौडा
३) व्यंकटेश कल्याणकर
४) ओंकार दाभाडकर

मर्यादित प्रवेश… त्वरित नोंदणी करा…. ◆

कार्यशाळेमध्ये सहभागी होणाऱ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

१) कार्यशाळेची संपूर्ण माहिती आणि अर्ज साहित्य सेतूच्या
🏻www.sahityasetu.org/karyshala
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तेथे *ऑनलाईन नोंदणी* करून प्रवेश घेता येईल.

२) कार्यशाळेची संपूर्ण माहिती आणि अर्ज ७०६६२५१२६२ या व्हॉटसअप क्रमांकावर  ‘कार्यशाळा’ असा संदेश पाठवून मागवता येईल.

३) साहित्य सेतूच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष भेट देऊनही कार्यशाळांसाठी नोंदणी करता येईल.

कार्यशाळेचे शुल्क
रू. १५०० /- प्रती व्यक्ती
२५ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रू. १०००/-

अधिक माहितीसाठी ९५५२८५८१०० किंवा ९४२०८५९८९३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

अधिकाधिक लेखनप्रेमी, भाषाप्रेमी विशेषत: युवक युवतींनी या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मसाप आणि साहित्य सेतूच्यावतीने करण्यात आले आहे.

या अभिनव उपक्रमासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. कृपया हा व्हॉटसअॅप संदेश आपल्या मोबाईलमधील व्हॉटसअॅपच्या सर्व ग्रुप्सना आणि कॉंटॅक्टसना पाठवावेत अशी नम्र विनंती

● कार्यालयीन संपर्क –
साहित्य सेतू – ६२२, जानकी रघूनाथ, पुलाचीवाडी, झेड ब्रिज जवळ, ऑफ जंगली महाराज रोड, कोहिनूर इंस्टिट्यूट नजिक, डि.सी.सी. कॉंप्युटर मॉलजवळ, डेक्कन जिमखाना पुणे ४११००४
दूरध्वनी :- (०२०) २५५३४६०१
मोबाईल- ९५५२८५८१००
व्हॉटसअॅप क्रमांक – ७०६६२५१२६२

● ईमेल :
namaste@sahityasetu.org

● कार्यालयाची वेळ :- सोमवार ते शनिवार सकाळी १०.३० ते संध्याकाळी ७.३० (रविवारी सुट्टी)

0