Posted on

‘ई-बुकमुळे वाचकांचा टक्का वाढतोय’

0

Maharashtra Times | Updated: Jan 28, 2018, 01:02AM IST

म. टा. वृत्तसेवा, ठाणे 

गेल्या काही वर्षांत वाचकांचा टक्का कमी होत असल्याची टीका होत आहे. मात्र, यात तथ्य नाही. कारण ई-बुक वाचकांची संख्या वाढत आहे. ई-बुक हे मुद्रीत पुस्तकांच्या तुलनेने स्वस्त आणि पटकन उपलब्ध होणारे असल्याने त्याचा वापर करणाऱ्या वाचकांच्या संख्येत वाढ होत असल्याचे प्रतिपादन ब्रोनेटो डॉट कॉमचे शैलेश खडतरे यांनी केले. शनिवारी गडकरी रंगायतन कट्टा येथे लेखक व इतिहास संशोधक सदाशिव टेटविलकर यांच्या ई-बुक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.

‘ई-बुक’मुळे वाचनसंस्कृती सर्वदूर पोहोचण्यास मदतच होणार आहे. मुद्रित पुस्तकांच्या वितरणाला मर्यादा असतात. शिवाय पुस्तकांचा खर्चही अफाट असतो. त्यामुळे या पुस्तकांच्या किंमतीही तुलनेने अधिक असतात. त्याउलट ई-बुक स्वस्त आणि जगभर उपलब्ध असते. कुणीही पैसे मोजून ते पुस्तक डाऊनलोड करू शकतो. त्याचा वितरणाचा आणि छपाईचा खर्च नसल्याने पुस्तकाच्या किंमती थेट अर्ध्यावर येतात. त्यामुळे स्वस्त पर्याय उपलब्ध झाल्याने अनेकजण ई-बुक वाचतात, असे खडतरे म्हणाले. ई-बुक प्रकारातील कोणत्याही पुस्तकाची २० पाने विनामूल्य वाचता येतात. मात्र ती कॉपी करता येत नाहीत. त्यामुळे पायरसी रोखली जाते. पैसे थेट लेखकाच्या बँक खात्यात जमा होतात. याशिवाय अनेक पुस्तके विनामूल्यही मिळतात. तसेच लेखकाचे लिखाणही जगभर पोहचण्यास मदत होते, अशी माहिती खडतरे यांनी दिली.

टेटविलकर यांच्या महाराष्ट्रातील वीरगळ, ‘दुर्गलेणी : दिव, दमण आणि गोव्याची’ ही दोन पुस्तके ब्रोनॅटो डॉट कॉमने इंग्रजीत ई-बुक रूपात प्रकाशित केली. त्याचबरोबर ‘दुर्गयात्री’ हे टेटविलकरांचे मराठीतील पुस्तक ई-बुक स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे. कोकण इतिहास परिषदेच्यावतीने गडकरी कट्टा येथे आयोजित एका समारंभात या तीन ई-बुकचे औपचारिक प्रकाशन झाले. रविंद्र लाड यांनी ई-बुक या आधुनिक माध्यमात ऐतिहासिक पुस्तके उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अनुवाद करणाऱ्या माधुरी गोखले यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. टेटविलकर यांनी त्यांच्या प्रास्ताविकात नव्या माध्यमात ऐतिहासिक लेखन उपलब्ध करून दिल्याबद्दल ब्रोनॅटो डॉट कॉमचे आभार मानले.

मूळ वृत्त येथे वाचा

0
Posted on

‘मुक्त व्यासपीठ’ आणि Bronato प्रस्तुत ‘काव्य स्पर्धा’

11+

प्रत्येक माणूस हा रसिक असतो आणि त्याच्या आत कुठे ना कुठे तरी एक कलाकार दडलेला असतो. तुमच्या आत देखील असाच एखादा कलाकार दडलेला असेल. अशा कलाकारांसाठी सुरवात झाली मुक्त व्यासपीठाची.. मुक्त व्यासपीठ हे युट्युब चॅनल गेले एक वर्ष साहित्यातील अनेक कलाकृती रसिकांसमोर आणायचा प्रयत्न करत आहे. ह्या मुक्त व्यासपीठाला दिनांक २८ जानेवारी २०१८ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने आम्ही, म्हणजेच ‘मुक्त व्यासपीठ’ आणि ‘bronato.com’ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने एक स्पर्धा आयोजित केली आहे, जिथे तुमच्या आत दडलेल्या कवीमनाला संधी मिळेल. तुम्हाला इतकंच करायचं आहे कि तुमची एक रचना आम्हाला ईमेल करायची आहे.

तुम्ही पाठवलेल्या कवितांपैकी काही निवडक कविता आम्ही bronato.com वर ब्लॉग स्वरूपात प्रसिद्ध करू. त्या नंतर सर्व निर्णय हा रसिकांचा असेल. प्रत्येक कविते खाली रसिकांना लाईक करण्याचं ऑप्शन असेल. सर्वाधिक लाईक असलेल्या ३ कवींना संधी मिळणार आहे ‘मुक्त व्यासपिठावर’ झळकण्याची. जिंकलेल्या ३ कवी आणि त्यांच्या कवितांचे मुक्त व्यासपीठ तर्फे व्हीडीओ बनवले जातील. आणि आपल्या चॅनल वरून प्रसिद्ध केले जातील.

आम्ही तुम्हाला संधी देत आहोत जगा समोर तुमच्या कवितेला सादर करण्याची. तर वेळ दवडू नका. लवकरात लवकर आम्हाला तुमची कविता पाठवा.

 

तुमच्या कविता आम्हाला ह्या इमेल आयडी वर पाठवा

mukt.sanvad@gmail.com

स्पर्धेचे नियम व अटी:

१. तुम्ही मुक्त व्यासपीठ हे युट्युब चॅनल सबस्क्राईब केलेलं असावे..

२. ब्रॉनतो.कॉम वर तुम्ही रजिस्टर असावे..

३. तुम्ही पाठवलेली कविता हि तुम्ही स्वतः रचलेली असावी..

४. पाठवलेली कविता जर ह्या पूर्वी कुठे हि प्रकाशित झाली असेल तर त्या कवितेचे पूर्ण हक्क तुमच्याकडे असणे आवश्यक आहेत.

५. स्पर्धे दरम्यान किंवा त्या नंतर हि जर कुणी हि त्या कवितेवर तुमच्या व्यतिरिक्त हक्क सांगितला आणि जर ती कविता तुमची नाही असं सिद्ध झालं तर ती कविता स्पर्धेतून रद्द केली जाईल..

या स्पर्धेची माहिती तुमच्या WhatsApp ग्रुपवर नक्की शेअर करा.

11+
Posted on

सदाशिव टेटविलकरांची पुस्तके आता इंग्रजीत 

0

ई-बुक आवत्तीचे शनिवारी प्रकाशन 

प्रतिनिधी, ठाणे 

सुप्रसिद्ध इतिहास संशोधक आणि लेखक सदाशिव टेटविलकर यांची ‘महाराष्ट्रातील वीरगळ’, ‘दुर्गलेणी-दिव, दमण आणि गोवा’ ही दोन पुस्तके आता इंग्रजीत इ-बुक स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. कोकण इतिहास परिषदेच्या वतीने ठाण्यात शनिवार, २७ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता गडकरी कट्ट्यावर या ई-बुक आवृत्तीचे प्रकाशन होईल. त्याचबरोबर ‘दुर्गयात्री’ हे टेटविलकरांचे मराठी पुस्तकही आता ई-बुक स्वरूपात वाचकांना उपलब्ध होणार आहे.


प्राचीन काळापासून युद्धभूमीवर मरण पावलेल्या शूरवीरांचे स्मारक उभारण्याची प्रथा प्रचलीत होती. आताही या स्मारकशिळा ठिकठिकाणी आढळून येतात. सदाशिव टेटविलकर यांनी  महाराष्ट्रात ठिकठिकाणी फिरून वैशिष्ट्यपूर्ण वीरगळांचा अभ्यास केला. त्यांच्या पुस्तकामुळे प्रथमच इतिहासातील हा दुर्लक्षित धागा प्रकाशात आला. आता ‘हीरोस्टोन ऑफ महाराष्ट्र’ या नावाने हे पुस्तक इंग्रजीत उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे गोवा, दिव आणि दमण या प्रांतातील गड, किल्ल्यांची माहिती देणारे त्यांचे मूळ मराठी पुस्तकही ‘फोर्ट केव्हजस्’ म्हणून इंग्रजीत उपलब्ध होईल. या दोन्ही पुस्तकांचा इंग्रजी अनुवाद पुण्यातील माधुरी गोखले यांनी केला आहे. ब्रोनॅटो डॉट कॉमच्या शैलेश खडतरे यांनी ई-बुक आवृत्ती वाचकांना उपलब्ध करून दिली आहे. इतिहासप्रेमी नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन कोकण इतिहास परिषदेने केले आहे.

0
Posted on

“अहवाल” या मराठी गझल संग्रहाचा प्रकाशन सोहळा

0

।। सस्नेह निमंत्रण ।।

गझलकार प्रशांत वैद्य यांच्या “अहवाल” या मराठी गझल संग्रहाचा प्रकाशन सोहळा
दि. २७ जानेवारी २०१८ रोजी सायंकाळी ५.०० वा . वैश्य समाज मंदिर हॉल, कासार हाट, कल्याण (प) येथे संपन्न होणार आहे.प्रमुख पाहुणे
मा. श्री. राजेंद्रजी देवळेकर – महापौर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका व इतर मान्यवर !

आणि

शब्दांकित” डोंबिवली निर्मित मराठी गझल मुशायरा “गझल तुझी नि माझी” !

सहभागी गझलकार
गोविंद नाईक, विजय उतेकर, वैभव कुलकर्णी, सुनील खांडेकर, राधिका फराटे, निर्मिती कोलते, संचिता कारखानीस, सानिका दशसहस्त्र, रेश्मा कारखानीस,

निवेदन : दत्तप्रसाद जोग
नेपथ्य आणि संकल्पना – निलेश गायधनी
नेपथ्य सहाय्य– गोविंद नाईक
सर्वाना आग्रहाचे निमंत्रण !

प्रकाशक – संवेदना प्रकाशन, पुणे
निमंत्रक – प्रज्ञा प्रशांत वैद्य

0
Posted on

‘क’ मुळे ठाणेकरांनी अनुभवाला एक वेगळा नायगावकरी काव्यानुभव

0

 

कधीही न ऐकलेल्या, वाचलेल्या प्रसिध्द कवींच्या कवितांचा “क” हा प्रयोग रविवारी सहयोग मंदिर येथे कोलाज तर्फे आयोजित करण्यात आला होता. या प्रयोगात जेष्ठ कवी अशोक नायगावकरांच्या अनहर्ड, अनरेड कवितांचे वाचन नायगावकरांसोबत नव्या दमाचे कवी गीतेश शिंदे, संकेत म्हात्रे आणि पंकज दळवी यांनी केले. डावे उजवे, शाकाहारी, टिळक या नायगावकरांच्या लोकप्रिय कविता टाळून उपहासात्मक आणि अंतर्मुख करणा-या कवितांचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला होता. मिडल क्लास कुटूंबातील पती पत्नीच्या प्रेमळ नात्याचे चित्रण नायगावकरांच्या आठवणी या कवितेतून घडले. या निमित्ताने त्यांच्या कवितेची तरल बाजूही समोर आली. अशीच तिंबत कणीक रहा तू, ज्योतिबा आभार या कवितांतून नायगावकरांनी समाजातील दांभिकतेवर अचूक बोट ठेवेले. हाच धागा पकडत संकेत म्हात्रे यांनी तू कर सत्कार तूला दिलेल्या व्रणांचे म्हणत एका गृहिणीचं घराभोवती फिरणारं आणि त्यातच समाधान मानायला लावणारं आयुष्य रेखाटलं, तर गीतेश शिंदे यांनी नवरा वारल्यावर या कवितेतून नवरा गेलेल्या बाईच्या मनाची घुसमट व्यक्त केली. पंकज दळवी यांनी नथूरामचं बॅडलक या कवितेतून हरवलेल्या तत्त्वांचा आणि गांधीवादाचा शोध घेतला.

या प्रसंगी या तिनही कवींनी नायगावकरांना विविध प्रश्न विचारून त्यांचा कवितेचा प्रवास उलगडला. कवितेने मनोरंजनही व्हायला हरकत नाही पण कवीचा आतला सूर सच्चा हवा त्यामुळेच कार्यक्रमात भरभरून हसणारा प्रेक्षक घरी जाताना मात्र अंतर्मुख झालेला असतो अशा भावना नायगावकरांनी व्यक्त केल्या. त्यांच्या अभिमान या कवितेने उपहासाचा सूर इतका टिपेला नेला की माणूस असण्याचा अभिमान वाटण्याऐवजी लाज वाटावी अशी भावना निर्माण झाली. निसर्गाचा घोटाळा या कवितेने निसर्गाकडे वेगळ्या चष्म्यातून बघायला भाग पाडले. भोपाळ चिकित्सा, केशवसूत म्हणाले, मूळाक्षरं या कवितांनी शेवटाकडे कार्यक्रमावर चढवलेल्या कळसाला प्रेक्षकांनी टाळ्यांनी मानवंदना दिली. या कार्यक्रमास अरूण म्हात्रे, अशोक बागवे, महेश केळूसकर, राजीव जोशी असे जेष्ठ कवी देखील प्रेक्षकांत उपस्थित होते. या निमित्ताने कोलाज तर्फे ह्या मान्यवरांच्या हस्ते नायगावकरांचा एक हृदय सत्कारही करण्यात आला. लवकरच ’क’चा नायगावकर विशेष हा पुढील प्रयोग रत्नागिरीस होणार असल्याचे संकेत म्हात्रे यांनी सांगितले.

0
Posted on

“थिंक टँक राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार” जाहीर

0

 

—————————————————————–

प्रा. श्रीमंत कोकाटे, डॉ. सुनील अवचार, वंदना कुलकर्णी मानकरी
——————————————————————

सोलापूर : प्रतिनिधी
थिंक टँक पब्लिकेशन्स, सोलापूरतर्फे “थिंक टँक राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार” प्रा. श्रीमंत कोकाटे, डॉ. सुनील अवचार, वंदना कुलकर्णी यांच्या ग्रंथांना जाहीर झाल्याची माहिती ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. पुरस्काराचे वितरण शनिवार, 27 जानेवारी 2018 रोजी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.

थिंक टँक पब्लिकेशन्सतर्फे चौथ्या वर्धापनदिनानिमित्त यंदापासून प्रथमच “राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार” देण्यात येत आहेत. या पुरस्कारासाठी राज्यभरातून प्रस्ताव मागविण्यात आले होते. जवळपास 113 ग्रंथांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते.
प्रा. श्रीमंत कोकाटे यांच्या “छत्रपती शिवाजी महाराज (सचित्र चरित्र)” या ग्रंथास दिवंगत पोलिस अधिकारी वसंतराव पगारे यांच्या स्मरणार्थ, डॉ. सुनील अवचार यांच्या “केंद्र हरवत चाललेल्या वर्तुळाचा परिघ (काव्यसंग्रह)” ग्रंथास दिवंगत सुभेदार सोनाप्पा मागाडे यांच्या स्मरणार्थ, तसेच वंदना कुलकर्णी यांच्या “काव्य सरिता सोलापुरी (संपादन)” या ग्रंथास दिवंगत जनार्दन गायकवाड यांच्या स्मरणार्थ हे राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार जाहीर झाले आहेत.


रोख रक्कम, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. शनिवारी ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांच्या हस्ते व ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सहाय्यक पोलिस आयुक्त भरत शेळके, भविष्य निर्वाह निधी विभागाचे क्षेत्रीय आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे, ज्येष्ठ पत्रकार दयानंद माने, डॉ. बाळकृष्ण मागाडे (वाई, जि. सातारा), सामाजिक कार्यकर्ते सुधीर चंदनशिवे, श्रीकांत गायकवाड उपस्थित राहतील.
ग्रंथांची निवड ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली.

कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन थिंक टँक पब्लिकेशन्सच्या प्रकाशिका रसिका भंडारे, संचालक डॉ. बाळासाहेब मागाडे तसेच ऋषीकेश खाकसे, धनंजय पाटील यांनी केले आहे.
📚📚📚📚📚📚📚📚📚

0
Posted on

‘क’ च्या दुसऱ्या प्रयोगात कविवर्य अशोक नायगांवकर

0


मराठी भाषेला समृद्ध करणारे आणि मराठी मनाला विचारांचे नवे वळण देणारे अनेक कवी होऊन गेले. पण कवींच्या कित्येक कविता अजूनही रसिकांपर्यंत पोहोचल्या नाहीत असं दिसून येतं. ह्याच उद्देशाने कोलाज नावाच्या संस्थेने ‘क’ नावाच्या कार्यक्रमाची निर्मिती केली ज्यात एका प्रख्यात कवीच्या आतापर्यंत राहून गेलेल्या किव्हा लोकांपर्यंत न पोचलेल्या कवितांचं वाचन केलं जातं. ह्या कार्यक्रमाची सुरवात कवी श्री अरुण म्हात्रे ह्यांच्या ‘अनरेड’ कवितांपासून सुरु झाली. येत्या २१ जानेवारीला ह्या कार्यक्रमाचा दुसरा प्रयोग ठाण्याच्या सहयोग मंदिरच्या दुसऱ्या मजल्यावर सायंकाळी  ५. ३० वाजल्यापासून पार पडणार आहे.

ह्या कार्यक्रमात कविवर्य अशोक नायगांवकर ह्यांना निमंत्रित कवी म्हणून बोलावण्यात आलं आहे. संकेत म्हात्रे, पंकज दळवी आणि गीतेश शिंदे हे त्यांच्या अप्रकाशित तसंच आतापर्यंत कार्यक्रमातून न वाचलेल्या कवितांचं त्यांच्यासोबत वाचन करतील. तेवढंच नाही तर त्यांना त्यांच्या कवितेसंबंधी, मराठी कवितेविषयी प्रश्नही विचारतील.


“एकीकडे आपण नायगावकरांना हास्य कवी म्हणून बघतो पण ते सामाजिक आणि तितकेच गंभीर कवी आहेत हे लोकांना फारसं माहीत नाही.  त्यांच्या वाटेवरच्या कविता ह्या काव्यसंग्रहातल्या कविता काळापुढच्या आहेत आणि गंमत म्हणजे त्या फारशा त्यांनी कार्यक्रमात वाचल्या नाहीत, म्हणून ह्या कार्यक्रमातून लोकांपर्यंत त्यांच्या ह्या कविता पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील,” असं पंकज दळवी ह्यांनी स्पष्ट केलं.

हा कार्यक्रम २१ जानेवारीला ठाण्याच्या सहयोग मंदिर येथे सायंकाळी ५. ३० वाजल्यापासून पार पडेल.

हा कार्यक्रम विनामूल्य आहे.

0
Posted on

एक रविवार मराठी कवितेचा दर्जा आणि समृद्धी अनुभवण्यासाठी

0

नवे वर्ष… नवे कवी… नवा मुक्काम…

पुन्हा एकदा आपल्या भेटीला !
अष्टगंध प्रस्तुत

कवितेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी…

मु.पो.कविता

रविवार दिनांक २१ जानेवारी २०१८
सायं. ४ वाजता.

रवींद्र लघुनाट्यगृह, प्रभादेवी, दादर.

सत्र-१

अंकुश आरेकर, मकरंद सावंत
अरूण गवळी, अमेय घरत
संदीप पाटील, रत्नमाला शिंदे

सत्र-२

नारायण लाळे, सतीश दराडे
प्राजक्त देशमुख, गोविंद नाईक
ज्योत्स्ना राजपूत, अन्वर मिर्झा

◆ अष्टगंध प्रकाशित कवी अन्वर मिर्झा यांच्या
शेवटी कविताच राहते शिल्लक‘ काव्यसंग्रहाचे प्रकाशन.

निवेदक/सूत्रधार : संजय शिंदे

संपर्क : ९८९२ २७६८३१

देणगी प्रवेशिका : १०० रु.

(प्रयोगाच्या दिवशी सभागृहावर उपलब्ध)

◆ देणगीदार/जाहिरातदार/प्रायोजकांचे स्वागत.

◆ नक्की या… मराठी कवितेचा दर्जा आणि समृद्धी अनुभवण्यासाठी…

0
Posted on

‘ओनामा’ हा नितळ मनाने लिहिलेला काव्यसंग्रह : लक्ष्मीकांत तांबोळी

0

नांदेड : २४ डिसेंबर

भावकवितेतील चिंतनशुद्धता कवी निशांत पवार यांच्याकडे आहे. ओनामा हा नितळ मनाने लिहिलेला पहिलाच कवितासंग्रह होय, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांनी केले.

कवी निशांत यांच्या ‘ओनामा’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ कुसुम सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. भगवंत क्षीरसागर तर भाष्यकार म्हणून प्रा. बी. एन. चौधरी व प्रा. यशपाल भिंगे उपस्थित होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संजीवकुमार राठोड, निर्माता, जय जगदंबा प्रॉडक्शन्स हे उपस्थित होते. प्रारंभी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दीप प्रज्वलनानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इसाप प्रकाशनाचे संचालक दत्ता डांगे यांनी केले. त्यानंतर प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी सरांच्या हस्ते कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कवी निशांत पवार यांनी यावेळी कवितालेखनामागची भूमिका विषद केली.

प्रा. तांबोळी पुढे म्हणाले की कवी हा जन्मावा लागतो. त्याचे आयुष्य Continue reading ‘ओनामा’ हा नितळ मनाने लिहिलेला काव्यसंग्रह : लक्ष्मीकांत तांबोळी

0
Posted on

दैनिक ‘सकाळ’ने दिली ब्रोनॅटो च्या यशोगाथेची नोंद

0

ब्रोनॅटोची बुक राईड १२/१२/२०१७

‘सध्याची पिढी वाचत नाही’ हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. पण थोडं बारीक निरीक्षण केल्यास जाणवेल की, सध्याची पिढी भयंकर वाचन करते आहे. पण ते डिजिटल स्वरूपातील वाचन आहे. या डिजिटल वाचनाची एक बाजारपेठ निर्माण झाली आहे. आणि या बाजारपेठेत सर्वात वेगाने वाढ होते आहे ती म्हणजे ‘ईपुस्तक उद्योगाची’.

२०१४ मध्ये जेव्हा मी ईपुस्तक प्रकाशन व्यवसायात उतरलो तेव्हा असं जाणवलं की या क्षेत्राचा ‘उद्योग’ म्हणून विकास होत नाहीये. आणि मला तर या क्षेत्रातील अमाप संधी खुणावत होत्या. मी ठरवलं की आपण व्यावसायिक दृष्ट्याच व उद्योग म्हणूनच ई पुस्तक निर्मिती करायची आणि ते ही जागतिक मापदंड वापरून. सुरुवातीपासूनच ईपुस्तके अधिक Continue reading दैनिक ‘सकाळ’ने दिली ब्रोनॅटो च्या यशोगाथेची नोंद

0