Posted on

डिजिटल पब्लिशिंग कार्यशाळेत Bronato 

0

 

मुंबई येथील C-DAC येथे २८ सप्टेंबर २०१८ रोजी ‘डिजिटल पब्लिकेशन कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेत BRONATO ला डिजिटल पब्लिकेशन संदर्भातील आपले अनुभव मांडण्याची संधी मिळाली.
ईसाहित्य चे सुनील सामंत यांच्या प्रेझेंटेशन ने सत्राची सुरुवात झाली. त्यांनी ईपुस्तक क्षेत्रातील आव्हाने व संधी यावर सखोल विवरण केले. उपस्थित सदस्यांशी खेळीमेळीच्या वातावरणात मार्गदर्शन केले व आपले मुद्दे मांडले.
स्मार्ट सोल्युशन च्या ‘हलंत बुक्स’ चे एस. एस. श्रीधर यांनी आपलय प्रेझेंटेशन मधून ‘प्रिंट ते ईपुस्तक रूपांतरण’ यावर आपले अनुभव मांडले.
नंतर Bronato चे शैलेश खडतरे यांनी ‘ईपुस्तक क्षेत्रातील तांत्रिक प्रगती- आव्हाने व संधी’ यावर एक चर्चात्मक प्रेझेंटेशन सादर केले. उपस्थितांनी चर्चेत उत्स्फूर्त सहभाग तर घेतलाच तसेच आपल्या मनातील शंका देखील विचारल्या.

सदर प्रेझेंटेशन मध्ये मांडलेल्या मुद्यांची नोंद C-DAC च्या प्रतिनिधींनी घेतली व प्रकाशकांच्या अडचणी दूर करण्यात शासकीय पातळीवर योजना राबवणार असल्याचे सांगितले.

अशा प्रकारच्या कार्यशाळा अधिकाधिक प्रमाणात घेतल्या जाव्यात व एकत्रितपणे ईपुस्तक उद्योग उभारणीसाठी सर्वांनी एकत्रित यावे असे सर्वानुमते सुचवले गेले.

एकंदरीत Bronato च्या प्रेझेंटेशन ची सर्वांनीच दखल घेतली व व्यक्तिगत ते सर्वांना आवडल्याचे नमूद देखील केले.

कार्यशाळेच्या शेवटी C-DAC च्या श्री महेश कुलकर्णी यांनी ईपुस्तक प्रकाशन क्षेत्रातील अडचणी दूर करण्यासाठी राबवण्यात आलेल्या व विकसित केलेल्या अनेक तांत्रिक सुविधांची सर्व उपस्थितांना माहिती दिली.

मराठी विश्वकोशासाठी C-DAC ने केलेल्या महाकाय प्रयत्नांची माहिती ऐकून प्रकाशकांनी आश्चर्य व्यक्त केले.

0
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *