Posted on

प्रसाद कुलकर्णी यांचे ऑडीयो बुक

0
आता पुस्तक वाचू नका… ऐका… आणि ते सुद्धा लेखकाच्याच आवाजात!

‘आनंदी आयुष्याचा मंत्र’ हे माझं पहीलंच ऑडीयो बुक (एकूण नववं), बुकगंगा डॉट कॉम ने (BookGanga.com) नुकतंच रिलीज केलंय. आणि ते त्यांच्या वेबसाईटवर उपलब्धही केलंय.

सहा महिन्यांपूर्वी पुणे भेटीत(Mandar Joglekar) यांनी ही कल्पना मला पटवून दिली. त्यांचं म्हणणं असं की नव्या पिढीत असा कितीतरी मोठा वाचकवर्ग आहे, जो काळाची गरज म्हणून इंग्रजी माध्यमातून शिकलाय किंवा शिकतोय. मराठी ही त्याची मात्रुभाषा आहे. आपल्या भाषेवर त्याचं मनापासून प्रेम आहे. त्याला मराठी चांगली समजते, बोलता येते…. पण वाचता येत नाही.

दुसरा वर्ग आहे तो मोठ्या संख्येने परदेशी स्थायिक झालेल्या आपल्या मराठी बांधवांचा. त्यांनाही मराठी हवीय, तेही घरी हटकून मराठी बोलतात, मराठी संस्क्रुती जपतात… पण त्यांना मराठी वाचता येत नाही.

त्यापलीकडे असा एक तिसरा वर्ग आहे, ज्याला मराठी चांगली बोलता येते, वाचताही येते…. पण पुस्तक वाचत बसण्याएवढा त्यांच्याकडे वेळ नाही.

अशा या जनरेशन नेक्स्टला मराठी साहित्य कसं द्यायचं…. तर त्यांच्यासाठी हा पर्याय आहे ऑडियो बुक चा. त्यात पुन्हा विषय तुमच्या अगदी कामाचाच असेल, तुमच्या मनात दडलेल्या खजिन्याची चावी तुमच्या हातात ठेवणारा…तर मग सोने पे सुहागा!

चला तर मग… आनंदी आयुष्याचा मंत्र जाणून घ्यायचा असेल तर हे पुस्तक डाऊनलोड करा आणि हवं तेव्हा, हव्या तेवढ्या वेळा (वाचू नका) ऐका!

जेव्हा जेव्हा निराश वाटेल, दु:खी वाटेल, विफलता येईल येव्हा यातल्या दहा लेखातला कोणताही लेख ऐका आणि….

आनंदी व्हा!

-प्रसाद कुलकर्णी


Please click the following link to directly go to the website-
http://www.bookganga.com/R2/174PO

 — with aishwarya sathe and mandar joglekar.

0
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *