Posted on

‘अक्षर मानव’कडून इतकी मोठी संधी, तुम्ही ती चुकवूच नये

0

एका चौफेर लेखणीशी मनमोकळा, आनंददायी आणि ज्ञानवर्धक संवाद सहवास.

|| अक्षर मानव संवाद सहवास ४ ||

दर चार महिन्यांनी एका मान्यवर, अभ्यासू व्यक्तीला बोलवावं आणि सलग दोन दिवस त्या व्यक्तीच्या संगतीत राहावं, असा एक अनोखा उपक्रम अक्षर मानवकडून घेतला जातो. पहिला संवाद सहवास झाला, डॉ. आ. ह. साळुंखे यांच्याशी, तर दुसरा संवाद सहवास झाला, डॉ. गणेश देवी यांच्याशी. आता हा तिसरा संवाद सहवास प्रसिद्ध लेखक, समाजकार्यकर्ते, छंदकार डॉ. अनिल अवचट यांच्याशी झाला. आता चौथा संवाद सहवास लोकसंस्कृतीच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांच्याशी होतो आहे.


निवांत, शांत ठिकाणी फक्त पन्नास माणसांनी जमावं आणि दोन दिवस मनमोकळ्या संवादाचा अनौपचारिक आनंद घ्यावा असा हा कार्यक्रम आहे.
यासाठी कसलीही फी, प्रवेशमूल्य नाही. राहण्याजेवणाची सोय मोफत.
ठिकाण : सातारा
दिनांक : १३, १४ जानेवारी २०१८.
नावनोंदणी मात्र आवश्यक. इच्छुकांनी स्वतःच्या माहितीसह मेलवर संपर्क करावा.
aksharmanav@yahoo.com

0
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *