Posted on

लेखनस्पर्धा ‘मराठी भाषा पंधरवडा’च्या निमित्ताने

0
१ जानेवारी ते १५ जानेवारी हा मराठी भाषा पंधरवडा म्हणून शासनाने घोषित केला आहे. गेले ३ वर्षे ज्ञानभाषा मराठी तर्फे हा पंधरवडा नेहमीच्या पठडीतले विषय न घेता इतर वेगवेगळ्या विषयांची निवड करून साजरा केला जात आहे आणि शासनाला अशा नवनवीन उपक्रमांची आम्ही माहिती देत आहोत.
#ज्ञानभाषामराठीपंधरवडा
उपक्रम २ – स्पर्धा
विषय – विज्ञानतंत्रज्ञानपरलेखन
बहुतेकवेळा आपण ललित साहित्याशी संबंधित विषयांवर निबंध स्पर्धा पाहत आलो आहोत. काळ बदलला, लोकांच्या आवडी-निवडी-हौशी-छंद सर्वच काळाप्रमाणे बदलत चालले आहेत. मग त्यानुसार अशा निबंध स्पर्धांचे विषयदेखील बदलायला हवेत आणि म्हणूनच त्यात आजच्या पिढीला रस वाटावा अशा विषयांचा समावेश केला पाहिजे या हेतूने ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानने चाकोरीबाहेर विचार करून विज्ञान-तंत्रज्ञानात मराठी या मूळ उद्देशाला कुठेही फाटा न देता, खुल्या गटाकरता पुढील विषयांवर निबंधलेखनस्पर्धा आयोजित केल्या आहेत.
◾ मला आवडलेले गॅजेट (तांत्रिक मुद्द्यांच्या अनुषंगाने)
◾मला आवडलेली दुचाकी/चारचाकी (तांत्रिक मुद्द्यांच्या अनुषंगाने)
◾सोशल मिडीया आणि मी
◾२१ व्या शतकातील शेती (तांत्रिक, वैज्ञानिक मुद्द्यांच्या अनुषंगाने)
◾ डिजिटल युगातील शिक्षक
शब्दमर्यादा : १२०० शब्द
निबंध पीडीएफ फाईलमध्ये  पुढील इमेलआयडीवर पाठवणे बंधनकारक आहे.
_निबंध पाठवायची शेवटची तारीख :_
_५ जानेवारी-२०१८_
अधिकाधिक मित्र-परिवाराला ज्ञानभाषामराठी च्या whatsapp गटांशी जोडून घ्या….गटात प्रवेशासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा.
सुचिकांत वनारसे-९०५२३४४४७६
अजित तिजोरे-८०९७६१७०२०
मृणाल पाटोळे-७६०६९१९८१६
फेसबुक पान – https://www.facebook.com/sarvatramarathi/
फेसबुक ग्रुप – https://www.facebook.com/groups/379194545862517/
ट्विटर हँडल – @SarvatraMarathi
#मराठीभाषापंधरवडा
#१ते१५जानेवारी२०१८
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठाण
संदेश पुढे पाठवत रहा
0
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *