Posted on

शब्दविद्येच्या राज्यस्तरीय काव्यफेरी स्पर्धेत सरिता फड़के काव्यसम्राज्ञी…!

1+

अहमदनगरचे राम गायकवाड़ “मॅन ऑफ़ द सीरीज” तर मुंबई च्या प्रियांका शिंदे – जगताप ठरल्या “वुमन ऑफ़ द सीरीज..”_

सलग ३ महीने चाललेल्या स्पर्धेत राज्यातून २७९ स्पर्धकांचा होता सहभाग…

रोख बक्षीस वितरण व् इतर सन्मान वितरण चित्रपट व् साहित्यिकांच्या उपस्तिथित ३ ऱ्या शब्दविद्या साहित्य स्नेहसंमेलनात….

शब्दविद्या कला साहित्य सांस्कृतिक युवा मंच तर्फे
ऑनलाइन “राज्यस्तरीय कोण होणार काव्यसम्राट / सम्राज्ञी” या १३ फेरी असलेल्या काव्यफेरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

३ महिन्यापासून सुरु असलेल्या या काव्यस्पर्धेचा निकाल दि. १९ नोव्हेंबर रोजी जाहिर करण्यात आला. अंतिम फेरीत पोहचलेल्या २७९ पैकी ५५ स्पर्धकाना “राज्यस्तरीय शब्दविद्या काव्यगौरव पुरस्कार २०१८” ने तर एक ही फेरी बाद न होता अंतिम फेरीत पोहचलेल्या २२ स्पर्धकाना “राज्यस्तरीय शब्दविद्या विशेष काव्यगौरव पुरस्कार २०१८” ने सन्मानित करण्यात येणार आहे.

संपुर्ण फेरीत सातत्यपूर्ण लेखन, वेगवेगळे आशय विषय तसेच सर्वाधिक गुण व् सरासरी लक्षात घेता “मॅन ऑफ़ द सीरीज” अर्थात “राज्यस्तरीय शब्दविद्या विशेष काव्यरत्न पुरस्कार” अहमदनगर्चे राम गायकवाड़ याना तर “वुमन ऑफ द सीरीज” अर्थात “राज्यस्तरीय शब्दविद्या विशेष काव्यरत्न पुरस्कार” मुंबई च्या प्रियांका शिंदे जगताप याना जाहिर करण्यात आला. तसेच सर्वाधिक विजेतेपद व् सरासरी गुण लक्षात घेता काही स्पर्धकाना “काव्यरत्न पुरस्कार” जाहिर करण्यात आला आहे.

आशा प्रकार वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या स्पर्धकानी यात बाजी मारली. अंतिम फेरित “विशेष सन्मान” नंदुरबार चे अजबसिंग गिरासे तर मुंबई च्या श्वेता म्हात्रे याना जाहिर झाला.

नियमानुसार “शब्दविद्या रत्न पुरस्कारास” कुणि ही पात्र न ठरल्यामुले ५००० रू ही बक्षीस रक्कम सामाजिक बांधीलकी जपत अनाथ आश्रमास दान करन्याच् अध्यक्ष ऋषिकेश सूर्यवंशी तसेच उपाध्यक्ष सुनील ससाणे पाटील व् पदाधिकाऱ्यानी जाहिर केलं.

अत्यंत चुरशीच्या राज्यभर उत्सुकता तानुन धरलेल्या स्पर्धेत १५० पैकी १३८.५ गुण, प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली “सरिता फड़के” यांनी.
५ हजार रूपये अधिक कवी. रोहिदास होले यांच्या तर्फे १००१रू रोख तसेच सनमांचिन्ह व प्रमाणपत्र अस स्वरुप ठेव्यात आलं आहे. “द्वितीय क्रमांक” चाकण येथील प्रकाश बनसोडे व व नाशिक येथील अरुण नन्दन याना प्राप्त झाला. ३ हजार रोख, सन्मानचिन्ह व् प्रमाणपत्र.

“तृतीय क्रमांक” दौंड चे रोहिदास होले तर वाशीम च्या लीना साकरकर याना जाहिर झाला. १ हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह व् प्रमाणपत्र.
“उत्तेजनार्थ प्रथम” नगर चे राम गायकवाड़, पुण्याच्या डॉ. गिताजंली शर्मा, मुंबईच्या प्रतीक्षा कांबळे यांना जाहिर झाला. ५०० रू रोख, सनमांचिन्ह व् प्रमाणपत्र
तर…
उत्तेजनार्थ दोन नाशिकचे अजय बिरारी, प्राजक्ता बिरारी, तर चन्द्रपुर चे नरेंद्र कन्नाके याना जाहिर झाला.

या स्पर्धेच परीक्षण संजीवनी राजगुरु भगवानदादा निळे, हनुमंत चांदगुडे, भीमराव कोते, सागर काकड़े, देवा जिंजाड़,किशोर पाठक, सुनंदा पाटील, अशोक गायकवाड़, सुनील पवार, हृदयमानव अशोक यांनी केले.

या स्पर्धेचे संकलन नरेंद्र कन्नाके, लक्षमन सावंत यांनी केले. सहकार्य अरुण नंदन व गुरुदत्त वाकदेकर यांनी केले.
संस्थापक हृदयमानव अशोक व शब्दविद्या कमिटी ने दरवर्षी प्रमाणे च अभूतपूर्व स्पर्धेचे आयोजन केले. सर्व बक्षीस वितरण एप्रिल च्या “३ रया शब्दविद्या साहित्य स्नेहसंमेलनात” चित्रपट व साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्तितीत होईल. राज्यभर चर्चित असलेल्या या संमेलनाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या सर्व उपक्रमांच नियोजन अध्यक्ष ऋषिकेश सुर्युवंशी, उपाध्यक्ष सुनील ससाणे पाटील, आधरस्तंभ अशोक ब सूर्यवंशी, संजीवनि राजगुरु, भीमराव कोते पाटील, निशा विस्पुते, शुभम वाळुंज, दिप पारधे, निखिल जगताप यांनी केले.

वृत्तांकन :- हृदयमानव अशोक

1+
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *