Posted on

दैनिक ‘सकाळ’ने दिली ब्रोनॅटो च्या यशोगाथेची नोंद

0

ब्रोनॅटोची बुक राईड १२/१२/२०१७

‘सध्याची पिढी वाचत नाही’ हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. पण थोडं बारीक निरीक्षण केल्यास जाणवेल की, सध्याची पिढी भयंकर वाचन करते आहे. पण ते डिजिटल स्वरूपातील वाचन आहे. या डिजिटल वाचनाची एक बाजारपेठ निर्माण झाली आहे. आणि या बाजारपेठेत सर्वात वेगाने वाढ होते आहे ती म्हणजे ‘ईपुस्तक उद्योगाची’.

२०१४ मध्ये जेव्हा मी ईपुस्तक प्रकाशन व्यवसायात उतरलो तेव्हा असं जाणवलं की या क्षेत्राचा ‘उद्योग’ म्हणून विकास होत नाहीये. आणि मला तर या क्षेत्रातील अमाप संधी खुणावत होत्या. मी ठरवलं की आपण व्यावसायिक दृष्ट्याच व उद्योग म्हणूनच ई पुस्तक निर्मिती करायची आणि ते ही जागतिक मापदंड वापरून. सुरुवातीपासूनच ईपुस्तके अधिक आकर्षित करण्यासाठी अनेक प्रयोग केले. बऱ्याच तांत्रिक बाबी शिकून घेतल्या. माझी मैत्रीण कीर्ती पाटसकर हिचे वडील श्रीकांत कुलकर्णी यांचे पाहिले ईपुस्तक २०१४ मध्ये प्रकाशित केले. स्वतःचे संकेतस्थळ सुरु केले. २०१५ मध्ये जगातील पहिल्या ट्विटर साहित्य संमेलनाची ‘स्मरणिका’ प्रकाशित केली. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना अत्याधुनिक स्वरूपातील ‘ईपुस्तके’ अनुभवता आली. मुळात ईपुस्तके म्हणजे नेमकं काय? याबाबत जागरूकता वाढवण्यास आम्ही प्राधान्य दिले होते त्यामुळे आमची बरीच प्रकाशने ‘निशुल्क’ उपलब्ध होती व आजही आहेत. फेसबुक व ट्विटर च्या माध्यमातून सलग प्रचार व प्रसार करत गेलो. लेखकांच्या गाठीभेटी घेतल्या. प्रत्येक लेखकाला अत्याधुनिक ईपुस्तकांच्या क्षमतांची व सरसतेची जाणीव करून दिली. आम्ही थेट ‘किंडल व गुगल प्ले बुक्स’ यांच्या ईबुक रीडर अॅप वर ईपुस्तके प्रकाशित करीत असल्याने विश्वासार्हता मिळवताना व व्यवसायातील आर्थिक बाबी समजावून सांगताना काहीच अडचण आली नाही. भेटलेल्या प्रत्येक लेखकाने त्यांची पुस्तके तर आम्हाला दिलीच शिवाय अनेकांनी आम्हाला इतर लेखकांचे पर्याय सुचवले आणि भेटायला मदत देखील केली.

वाढता व्यवसाय अधिक सुदृढ करण्यासाठी ‘Broanto’ नावाने अधिक सरस संकेतस्थळ सुरु केले. आज Bronato (ब्रोनॅटो) च्या माध्यमातून किमान ३२ देशांमध्ये मराठी ईपुस्तके वाचली जात आहेत. ७० हजार ईपुस्तके डाउनलोड झाली आहेत व हा आकडा रोज शेकडो ने वाढतो आहे.

ईपुस्तक उद्योग सुरु करताना प्रचलित प्रिंट पुस्तक व्यवसायातील काही पद्धती अनुसरणे घातक ठरले असते शिवाय ही बाजारपेठ वेगळी असल्याने विशेष कार्यप्रणालीची गरज होती. ती विकसित करत गेलो. लेखकांना आर्थिक भुर्दंड न पडता त्यांचे साहित्य जगभर पोचवणे आणि सोबतच वाचकांना उत्तम वाचनानुभव मिळवून देणे हे आमचे लक्ष आहे. त्यामुळे सर्वात महत्वाचा निर्णय आम्ही घेतला तो म्हणजे लेखकांना अधिक सक्षम करण्याचा. त्यासाठी कोणत्या देशात किती ईपुस्तके डाउनलोड झाली व त्यातील आर्थिक मिळकत किती याचा तपशील आम्ही लेखकांना पाठवतो. किंडलसाठी लेखकांचे अकाऊंट तयार करून देतो जेणेकरून लेखक स्वतःच पुस्तकांचा तपशील पाहू शकतो. व मिळकत थेट त्यांच्या अकाउंटवर जमा होते.

ईआवृत्ती जगभर उपलब्ध होते, त्यामुळे नवीन आवृत्ती काढण्यापेक्षा सध्या लेखक ईआवृत्तीला पसंती देत आहेत. शिवाय Bronato ची ईआवृत्ती ही प्रिंटसारखीच किंबहुना अधिक आकर्षक असल्याने त्यास पसंती मिळत आहे. सध्या ब्रोनॅटो भाषांतरे, प्रूफरीडिंग, मुखपृष्ठ तयार करणे या सुविधा देखील पुरवत आहे.

स्वतः ईपुस्तके प्रकाशित करण्यासोबतच इतर प्रिंट प्रकाशकांना देखील त्यांच्या ईआवृत्ती प्रकाशनासाठी ब्रोनॅटो सर्वोतोपरी सहकार्य व मार्गदर्शन करते. कालनिर्णय तर्फे प्रकाशित जो ‘दासबोध’ आज किंडल मार्फत जगभर उपलब्ध आहे तो ब्रोनॅटो’ च्या अभिमानास्पद कामांपैकी एक आहे.

नवीन लेखकांसोबतच प्रस्थापित लेखकांना देखील ईपुस्तकांचे महत्व पटते आहे. ईपुस्तक उद्योगात भविष्यात अधिक सेवा पुरवत लेखकांचा जास्तीत जास्त आर्थिक फायदा केंद्रस्थानी ठेवून ब्रोनॅटो उत्तमोत्तम साहित्य जगभर पोचवत राहील.

सकाळ समूहाने ब्रोनॅटोच्या कामाची नोंद घेतली यासाठी खूप खूप धन्यवाद.

0

One thought on “दैनिक ‘सकाळ’ने दिली ब्रोनॅटो च्या यशोगाथेची नोंद

  1. माझं अकाऊंट कसं create करता येईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *