पसायदान साहित्य मंच, बोरिवली(प) आयोजित *काव्यपंचमी-रंगपंचमी* हा दर धुळवडीच्या दिवशी होणारा कवितांचा कार्यक्रम ह्याही वर्षी भाऊ साहेब वर्तक महाविद्यालय, गोराई, बोरिवली(प) येथे धुमधडाक्यात पार पडला. यावेळेस 27 स्थानिक कवींनी आपल्या कविता सादर केल्या तर 6 निमंत्रित कवींनी पुढचे सत्र गाजवले. निमंत्रितांमध्ये ज्येष्ठ कवी प्रसाद कुलकर्णी, अनुराधा नेरुरकर, भगवान निळे, संगीता अरबुने व सदानंद बेंद्रे सहभागी झाले होते. कार्यक्रमाचं संयोजन व निमंत्रितांच्या सत्राचे सूत्र संचालन कवयित्री किर्ती पाटसकर हिने डॉ. शंकर मोडक ह्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं. तर प्रथम सत्राचे सूत्र संचालन कवयित्री स्वरूपा सामंत हिने केलं. धुळवड असल्याने येणाऱ्या सर्व रसिकांना आणि कवी कवयित्रींना गुलाल लावून संमेलनाची सुरुवात झाली. त्यानंतर पसायदान चे ज्येष्ठ सभासद श्री. प्रभाकर वाडेकर ह्यांनी माय मराठी गीत सादर केले तर सौ. वर्षा रेगे ह्यांनी प्रास्ताविक केले.