Posted on

हिरजची हिरकणी अाणि चुंगीची पोरं। Bookshelf

0

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. भास्कर थोरात यांनी त्यांचे अात्मकथन ‘हिरजची हिरकणी अाणि चुंगीची पोरं’ या पुस्तकातून मांडले अाहे. सहा विभागात विभागलेल्या त्या अात्मकथनाला संस्कार अाणि अनुभव अशा दोन घटकांची बैठक अाहे. अभावाच्या परिस्थितीत थोरात यांच्या अाईने त्यांच्यावर अाणि त्यांच्या भावंडांवर केलेले संस्कार थोरातांच्या जडणघडणीचा अाधार ठरले. त्यापुढील काळात थोरात यांनी जातीव्यवस्थेचे चटके सोसत खडतर परिस्थितीतून शिक्षण घेत ‘आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ’ अशी किर्ती प्राप्त केली. त्यांच्या त्या प्रवासातील अनुभवाचे सार तरूण पिढीसमोर मांडावे अाणि त्यातून त्यांना हा या पुस्तकातील निवेदनाचा मूळ गाभा आहे. स्त्रीशक्तीचा जागर, सामाजिक व्यवस्थेचे पानोपानी अालेले संदर्भ अाणि एका शास्त्रज्ञाचा गतकालाकडे आणि देशाच्या भविष्याकडे पाहण्याचा व्यापक दृष्टीकोन अशी या पुस्तकाची अनेक वैशिष्ट्ये अाहेत.

‘बुकशेल्फ’ चॅनेलकडून सादर करण्यात अालेला ‘हिरजची हिरकणी अाणि चुंगीची पोरं’ या पुस्तकाचा परिचय जरूर पाहा. थोरात यांचे हे अात्मकथन ‘ग्रंथाली’कडून प्रकाशित करण्यात अाले अाहे. ते पुस्तक थेट ‘ग्रंथाली’कडून विकत घेतल्यास पुस्तकाच्या किमतीत ४० टक्के सूट मिळेल. 02224306624, 9223466860 granthaliruchee@gmail.com
– टीम बुकशेल्फ

0
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *