Posted on

पुस्तक परिचय: हृषीकेश जोशी यांची ‘दुसरी बाजू’

0

ह्रषिकेश जोशी या लेखक व अभिनेता असलेल्या व्यक्तिमत्वाने लिहिलेले हे अप्रतिम पुस्तक आहे. जगण्यातील विसंगतीवर लेखकाने नेमकेपणाने भाष्य केले आहे. समाजातील विचारांना, घटनांना दुसरी बाजु असु शकते याचा विचारही आपण करत नाही. लेखकाने अनेक उदाहरणे देऊन ते स्पष्ट केले आहे. तर्कशुध्द, परखड, आणि नेमकी अशी पुस्तकाची भाषा आहे. काही प्रसंग लेखकाच्या पाहण्यात आलेले तर काही समाजात घडलेले. पण त्यावरचे भाष्य मात्र अचुक आहे. पुस्तकातील काही गोष्टींचा पुसटसा उल्लेख या माझ्या पोस्टमध्ये मी करतो, जेणेकरुन या पुस्तकाविषयी कुतुहल वाढुन ते वाचण्यास तुम्ही प्रवृत्त व्हाल.

१) निर्भया प्रकरण देशभर गाजले आणि समाजात त्याचे विविध पडसाद उमटले. त्या काळात लेखकाने एका हिंदी वाहिनीवरील लहान मुलांच्या शोच्या परीक्षकाचे काम केले होते. एका छोट्या मुलीने अभिनयासाठी जो प्रवेश सादर केला, त्याचा लेखकालाच धक्का बसला, काय होता तो प्रसंग? 
२) एका शाळेत प्रामाणिक पर्यवेक्षकाने परीक्षेत मुलांना काॅपीच करु दिली नाही, त्यावरची मुलांची अन पालकांची प्रतिक्रिया धक्कादायकच…
३) लेखक जेव्हा स्काॅटलंडला एका कार्यक्रमासाठी गेला होता. रात्री कार्यक्रम संपल्यांतर यजमानांच्या गाडीतुन लेखक निघाला. हायवेला गाडी लागल्यानंतर काही वेळाने त्याच्या लक्षात आले की स्काॅटलंड पोलिसांची गाडी त्यांचा पाठलाग करत आहे. त्यांनी कुठला नियम मोडला नव्हता की वेगही जास्त नव्हता. मग पाठलाग का होतोय ते कळेना. यजमानांनी गाडी बाजुला थांबवली आणि पोलिसांच्या गाडीजवळ गेले. काही वेळाने पाठलाग करण्याचे कारण जेव्हा लेखकाला कळले तेव्हा तो आश्चर्यचकितच झाला आणि त्याचा विश्वासच बसेना. काय होते ते कारण?


असं बरंच काही विचार करायला लावणारं या पुस्तकात आहे. नक्की वाचा.
या पुस्तकावर मी लिहिलेली चारोळी….

दुसरी बाजु उलगडतेय
जगण्यातला विरोधाभास,
जाणवतंय लिहितानाचा
लेखकाचा ऊद्वेग नि त्रास॥
मंगेश निमकर

0
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *