Posted on

ब्रोनॅटो संकल्पना

0

‘ब्रोनॅटो’ हा एक अर्थमुक्त शब्द आहे. मी संकेतस्थळासाठी नवीन नावाचा जेव्हा विचार करत होतो तेव्हा अचानक हा शब्द मनात चमकला. त्याची चमक इतकी मस्त होती की ‘हेच ते नाव’ ‘यस!!’असा अनुभव झाला आणि मनात ‘ब्रोनॅटो… ब्रोनॅटो’ नावाचा जप सुरु झाला.

ब्रोनॅटो हा शब्द नेट वर शोधला तर हा शब्दच इंग्रजी भाषेत नव्हता. हायसं वाटल. म्हणजे या शब्दाचा ‘अर्थ’ आपण निर्माण करू शकतो असे वाटले.

मग ईपुस्तके आणि ब्रोनॅटो यांचा संबंध काय? तसं पाहिलं तर थोड्या दिवसांपूर्वी यांचा काडीचाही संबंध नव्हता, पण आता आहे. ‘ब्रोनॅटो’ म्हणजे ‘सुंदर ईपुस्तके, सुंदर वाचनानुभव’ अशी ओळख निर्माण व्हावी यासाठी आमचे प्रयत्न असतील.

ईपुस्तक उद्योगात विशिष्ट ध्येय्य समोर ठेऊन सुरु केलेला आमचा हा प्रवास आज या सुंदर वळणावर आला आहे. २०१४ मध्ये सुरु झालेल्या या प्रवासातील प्रत्येक दिवस हा ईपुस्तक उद्योगातील आमच्या धडपडीला, चिकटीला आणि सृजनशील कष्टाने भरलेला आहे. तो असाच सुरु राहील.

आमच्या लेखकांना, प्रकाशकांना, संलग्न तज्ज्ञ मंडळी यांना एक व्यावसायिक व्यासपीठ मिळवून देणे व जगभरातील आमच्या वाचकांना उत्तम साहित्यचा वाचनांनाद मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहूच.

हे संकेतस्थळ पूर्णपणे निःशुल्क आहे. जास्तीत जास्त लोकांना आमच्या सेवा व सुविधांबाबत कळावे यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. आमच्या पुस्तकांच्या किंवा संकेतस्थळाच्या लिंक शेअर करा. हे संकेतस्थळ पूर्णपणे निःशुल्क आहे. 

आपला लोभ वाढत राहो व आमच्या प्रयत्नांना यश मिळत रहावे. 

लोभ असावा.

0

2 thoughts on “ब्रोनॅटो संकल्पना

  1. साहित्य विश्वातील अभिनव उपक्रम

    1. आमच्या प्रयत्नांना अशी दाद मिळणे उत्साहवर्धक आहे. प्रतिसाद व प्रोत्साहनासाठी धन्यवाद. संपर्कात राहूच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *