Posted on

ते चार दिवस…

1+

आपण अशा सोसायटीत राहतो याची चीड करण्याशिवाय जेव्हा हातात काहीच उरत नाही… बाईच्या अवयवांपासून ते तिच्या चरित्र्यपर्यंत कुठल्याच गोष्टीचे वाभाडे ज्या समाजाने काढायचे सोडले नाहीत.. त्यांच्यासाठी सॅनिटरी नॅपकिन्स वर ती चैनीची वस्तू आहे म्हणून टॅक्स लावणे यात मोठी गोष्ट ती काय…??

गावी बस ची सोय नाही म्हणून मी मजबुरीने होस्टेलवर राहू लागले… जिथे साधी अंतरवस्त्रे सुकवायला जागा नव्हती तिथे माझ्यासारख्या दीडशे जणी ती चार दिवस वापरायची कपडे कुठे सुकणार होत्या… घरून मिळणाऱ्या जेमतेम पैशामध्ये ही सुद्धा एक गरजेची गोष्ट होऊन गेली.. त्यात चैन आलीच कुठे…??

असच काहीस प्रवासाच ही… प्रवासात जेव्हा कुठल्यातरी ओंगळवाण्या बस स्टॉप वर 15 मिनिटासाठी गाडी थांबते… दूरच प्रवास म्हणून ईच्छा नसतानाही आम्हाला ती घाणेरडी प्रसाधन गृहे वापरावी लागतात… त्या न तशा ठिकाणी आम्ही वापरलेली पारंपरिक नॅपकिन्स संपूर्ण प्रवासभर जवळ ठेवावी की इतरांच्या आरोग्याची काळजी न करता तशीच फेकून द्यावी…??

त्या चार दिवसात स्वतःचा जन्म नकोसा व्हावा… फक्त बाई म्हणूनच नव्हे तर आपण जन्मालाच का आलो हा प्रश्न सतत भेडसावत राहावा… अशा वेळी आम्ही चैन करतो नाही का… आजपण अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या आपल्या तुटपुंज्या कमाईतून त्या चार दिवसाच्या खर्चासाठी पैसे वाचवून ठेवतात…

सॅनिटरी नॅपकिन्स वर टॅक्स लावून जर देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये खूप फरक पडणार असेल तर आवडेल आम्हालाही टॅक्स भरायला… पण ही चैनीची वस्तू नाही हे विसरू नका…

✍ निकिता चव्हाण

1+

4 thoughts on “ते चार दिवस…

  1. खरचं बरोबर आहे तूझं निकी…या गोष्टींवर चिडावं…संतापावं की गप्प बसून नुसतं बघत बसावं….हा एक प्रश्नचं आहे

  2. Very well written Nikki..!👍
    It is ridiculous thing tht such an important thing like sanitary napkin is charged 12% tax, while the thing like bindi is tax free. But its not equally important(although a part of indian culture). Think tht govt dont knw tht we cant use bindis down thr.😔😟

  3. धडधडीत सत्य असताना सुद्धा जाणूनबुजून तिकडे शेरे मारणाऱ्या पुरूषप्रधान संस्कृतीकडून कसली अपेक्षा करणार. जिकडे बाईकडे केवळ भोगवस्तू म्हणून पाहिले जाते त्या समाजात ही परिस्थिती बदलण्यासाठी स्त्रियांनीच पुढाकार घ्यायला हवा… अप्रतिम लेखन आणि विचार सुद्धा..

  4. Well said Nik . . !!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *